आरसीबीला मिळणार नाही यंदा ट्रॉफी?

    दिनांक :26-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
RCB will not win the trophy this year आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये चार संघांनी आपले स्थान निश्चित केले असून स्पर्धेचा थरार आता शिखरावर पोहोचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत दमदार कामगिरी केली असली तरी आकडेवारीच्या आधारे त्यांच्या विजेतेपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघही ट्रॉफीच्या शर्यतीत कायम आहेत.
 
 
 
RCB
 
या हंगामात गुजरात टायटन्सने सातत्यपूर्ण कामगिरी करत दुसरे स्थान मिळवले असून इतिहासातील आकडेवारी त्यांच्यासाठी आशादायक मानली जात आहे. आतापर्यंत आयपीएलच्या १८ हंगामांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाने सर्वाधिक वेळा, म्हणजेच नऊ वेळा विजेतेपद पटकावले आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरात टायटन्स हा संघ यंदा ट्रॉफीचा प्रबळ दावेदार ठरू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
 
दुसरीकडे, अव्वल स्थानावर राहिलेल्या संघांनी सहा वेळा, तिसऱ्या क्रमांकावरील संघांनी दोन वेळा आणि चौथ्या क्रमांकावरील संघांनी फक्त एकदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे टॉप पोझिशन मिळवणाऱ्या संघापेक्षा दुसऱ्या स्थानावरील संघाचा यशाचा दर अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर आरसीबीने लीग टप्प्यात दाखवलेले वर्चस्व फायनलमध्ये टिकेल का, की पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावरील संघ इतिहास घडवेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.