नागपूर,
Shaunaks Brilliant Performance नागपूरच्या १४ वर्षीय बुद्धिबळपटू शौनक धनराज बडोले याने कॉमनवेल्थ युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये शानदार कामगिरी करत दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. श्रीलंकेतील कालुथारा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत शौनकने स्टँडर्ड आणि रॅपिड या दोन्ही प्रकारांमध्ये अपराजित राहून सुवर्णपदक पटकावले.
शौनकच्या या यशामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून देशाच्या क्रीडा क्षेत्रातही अभिमानाची भर पडली आहे. उत्कृष्ट खेळ, एकाग्रता आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. Shaunaks Brilliant Performance नागपूरमधील नारायणा विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या शौनकने लहान वयातच जागतिक स्पर्धेत चमकदार यश मिळवत शहराचे नाव उंचावले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र