लोणार,
teacher taslim ali भारताच्या १६ व्या देशव्यापी जनगणना अभियानांतर्गत पहिल्या टप्प्याचे काम (घर सूचीकरण व घर गणना) लोणार शहरात वेगाने सुरू आहे. या मोहिमेत येथील इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहायक शिक्षक तसलीम अली रफिक अली सर यांनी आपले दिलेले उद्दिष्ट सर्वप्रथम १००% पूर्ण करण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय आणि गतिमान कामगिरीबद्दल लोणार नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा जनगणना चार्ज अधिकारी डॉ. बोबडे साहेब यांच्या हस्ते शाल देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणनेच्या कामात अनेक तांत्रिक आणि क्षेत्रीय आव्हाने असतानाही, तसलीम अली सरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि तत्परतेने आपले काम वेळेआधीच पूर्ण केले. राष्ट्रीय कर्तव्यात दाखवलेल्या या उत्कृष्ट तत्परतेबद्दल प्रशासनाकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.teacher taslim ali या गौरव सोहळ्याप्रसंगी लोणार नगर परिषदेचे जनगणना सहायक तथा लिपिक श्री. एन्नेवार साहेब, जनगणना पर्यवेक्षक श्री. बोरुड सर आणि सहायक श्री. नईम खान सर प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी तसलीम अली सरांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले असून, हे यश इतर प्रगणक आणि शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. सरांच्या या कामगिरीमुळे इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल व संपूर्ण लोणार शिक्षण वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.