आता अमेरिका ‘फौेज में’, भारत ‘मौज में‘

होर्मुजची कटकट कायमची संपवली, तयार केला नवा ‘ट्रेड कॉरिडॉर’

    दिनांक :26-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Hormuz इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून भारतालाही गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे. तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने भारताच्या आयात खर्चात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत आणि ओमान यांच्यात झालेला मुक्त व्यापार करार 1 जून 2026 पासून लागू होणार असून, यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
hormuz trump 
Hormuz विशेष म्हणजे ओमान हा होर्मुज सामुद्रधुनीच्या बाहेरील भागात असल्याने भारताला व्यापारासाठी पर्यायी आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कराराकडे रणनीतिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाच्या रूपात पाहिले जात आहे.
Hormuz भारत-ओमान करार 1 जूनपासून लागू
भारत आणि जारप यांच्यात 18 डिसेंबर 2025 रोजी कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अ‍ॅग्रीमेंटवर स्वाक्षèया झाल्या होत्या. हा करार आता 1 जून 2026 पासून अधिकृतपणे लागू होणार आहे. गेल्या काही वर्षांत भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. मात्र, ओमानसोबतचा हा करार विशेष मानला जात आहे. कारण ओमानचे भौगोलिक स्थान होर्मुज सामुद्रधुनीच्या बाहेर आहे. त्यामुळे होर्मुजमधील तणाव किंवा जहाज वाहतुकीवरील अडथळ्यांचा थेट परिणाम या व्यापार मार्गावर होणार नाही.
Hormuz मुक्त व्यापार करारामुळे काय होणार फायदा?
या करारानुसार ओमानने भारतातून जाणाèया 98.08 टक्के वस्तूंवरील आयात शुल्क पूर्णपणे हटवले आहे. त्यामुळे भारताचा ओमानला होणारा 99.38 टक्के निर्यात व्यापार पूर्णपणे टॅरिफ-फ्री होणार आहे.