नागपूर,
the shadow has vanished “सावली कधीही माणसाची साथ सोडत नाही,” असे म्हटले जाते. मात्र वर्षातून दोन वेळा असा क्षण येतो, जेव्हा काही क्षणांसाठी व्यक्तीची सावली पूर्णपणे अदृश्य होते. या नैसर्गिक खगोलीय घटनेचा अनुभव आज रोजी दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी नागपुरात पाहायला मिळाला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन विभागातील कर्मचारी रमेश मेहर यांनी विभागाच्या मोकळ्या परिसरात उभे राहून “शून्य सावली दिन” अनुभवला. यावेळी काही क्षणांसाठी त्यांच्या शरीराची सावली पूर्णपणे नाहीशी झाल्याचे दिसून आले. या आगळ्यावेगळ्या खगोलीय घटनेचा त्यांनी आनंद घेतला. the shadow has vanished दरवर्षी सूर्य पृथ्वीच्या अगदी डोक्यावर येत असताना ही घटना घडते. त्या क्षणी वस्तूंची सावली जमिनीवर दिसेनाशी होते. विज्ञानप्रेमी आणि नागरिकांसाठी हा अनुभव नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरतो.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र