नागपूर,
Didolkar Bhavan राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिती आणि राष्ट्र सेविका समिती, शचि शाखा, पांडे ले आऊट यांच्या संयुक्त विद्यमाने डिडोलकर भवन येथे आयोजित दहा दिवसीय बालसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोककल्याण समितीचे शंकर साठे होते. प्रमुख वक्त्या म्हणून वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रांत आयाम सहप्रमुख जयश्री पिंपुटकर उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून लोककल्याण समिती सोमलवाडा भाग व महानगर सुपोषण समुपदेशनाच्या संयोजिका सविता जोशी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा परिचय करून देण्यात आला तसेच त्यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. शिबिरार्थींनी श्लोक, वर्ग प्रार्थना, योगासन, विश्वशांती प्रार्थना, गौळण नृत्य, नाटिका आणि बालगीतांचे सादरीकरण केले. एका विद्यार्थिनीने कॅसिओवर वंदे मातरम वाजवून कार्यक्रमाची सांगता केली. Didolkar Bhavan कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्यात आली तसेच उपस्थित पालक व निमंत्रितांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हेमातई मुंजे, वर्षा हिवरखेडकर, अनघा आठवले, सुनिता नाजपांडे, निता नारळे, रेणुका शुक्ल यांच्यासह अनेक सेविकांनी परिश्रम घेतले. शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले.
सौजन्य: दीप्ती पट्टलवार, संपर्क मित्र