खाकीचा प्रामाणिकपणा..!

    दिनांक :26-May-2026
Total Views |
बसस्थानकावर हरवलेली पैशांची बॅग केली सुपूर्द

वणी, 
Wani Police Constableपोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने दाखवलेला प्रामाणिकपणा आणि तत्परतेमुळे हिंगणा तालुक्यातील एका महिलेला तिची हरवलेली पैशांची बॅग सुखरूप परत मिळाली. या घटनेमुळे वणी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पूजा वीरू राऊत या रविवार, 24 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास वणी बस स्थानकावर आल्या होत्या. यावेळी गडबडीत त्यांची हँडबॅग हरवली. बॅगमध्ये रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र बॅग सापडली नाही.
 
 
policdidisi
 
Wani Police Constable दरम्यान, वणी पोलिस शिपाई रितेश हे कर्तव्यावर असताना त्यांना बसस्थानक परिसरात ही बॅग बेवारस आढळली. त्यांनी तत्काळ बॅग ताब्यात घेत तिची पाहणी केली असता त्यामध्ये रोख रक्कम व कागदपत्रे असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिस रितेश यांनी वरिष्ठ अधिकाèयांना माहिती देत बॅगेच्या मूळ मालकाचा शोध सुरू केला. काही वेळातच पूजा राऊत यांचा शोध लागल्यानंतर बॅगेतील वस्तू आणि रकमेची खातरजमा करून त्यांना बॅग सुपूर्द करण्यात आली. आपली हरवलेली बॅग आणि त्यातील कष्टाची कमाई सुरक्षित परत मिळाल्याने पूजा राऊत यांनी वणी पोलिसांचे, तसेच पोलिस शिपाई रितेश यांचे विशेष आभार मानले. या प्रामाणिक कामगिरीमुळे नागरिकांत पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.