शिर्डी
Indorikar Maharaj' इंदोरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी अनब जावई साहिल चिलप यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला गेले असता हा व्हिडीओ काढण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये साहिल आणि ज्ञानेश्वरी गाडीची पूजा करताना दिसत आहेत. मात्र त्या गडीवरील एक लोगो आणि अक्षराने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
Indorikar Maharaj' प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेरमध्ये पार पडला. या लग्नासाठी 100 एकरावर मंडप उभारण्यात आला होता. या विवाह सोहळ्याला राज्यभरातून दिग्गज मान्यवरांसह अहिल्यानगर, पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील नागरिकांनी हजेरी लावली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांसह वारकरी आणि धार्मिक क्षेत्रातील लोक या लग्नाला हजर होते.
गाडीची चर्चा का?
Indorikar Maharaj' साहिल चिलप यांच्या गाडीवर ततखझ आणि लोकसभा सदस्य चझ असा उल्लेख असणारे स्टिकर चिटकवलेलं आहे. यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, नेमकं खासदार कोण आहे? चिलप यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर त्या गाडीचे अनेक फोटोस आणि व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये ती गाडी दिसून येते. चिलप घराण्यात नेमकं खासदार कोण आहे? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.
मग ते खासदार कोण?
Indorikar Maharaj' इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार संबंधित गाडी साहिल चिलप यांनी डिसेंबरमध्ये खरेदी केली आहे. मात्र या गाडीवरती नंतर ततखझ आणि चझ असल्याचे स्टीकर आले. साहिल चिलप जर खासदार नाहीत मग त्यांनी हा लोगो का चिटकवला? ते गाडी कुणाला वापरायला देतात का? देत असेल तर ते खासदार कोण? असे प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाले आहेत.
कोण आहेत साहिल चिलप?
Indorikar Maharaj' ज्ञानेश्वरीचा विवाह साहिल चिलप यांच्याशी झाला आहे. साहिल हे नवी मुंबईतील उद्योजक सुनील विष्णू चिलप आणि मनिषा चिलप यांचे सुपुत्र आहेत. सध्या त्यांचे कुटुंब पनवेल येथे वास्तव्यास आहे. चिलप कुटुंबाचे मूळ गाव जुन्नर तालुक्यातील काटेडे आहे. शिवनेरी किल्ला पायथ्याशी त्यांचा आलिशान बंगला असून तेथून किल्ल्याचे भव्य दृश्य दिसते. कुटुंब अत्यंत धार्मिक असून घरात २४ तास हरिपाठ सुरू असतो.
लॉजिस्टिक क्षेत्रात मोठं नाव
आज चिलप कुटुंबाकडे १०० ते १२५ कंटेनर असून एमएस लॉजिस्टिक नावाची कंपनी न्हावाशेवा येथे कार्यरत आहे. लॉजिस्टिक क्षेत्रात त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.