घाबरू नका...एआय खाणार नाही नोकऱ्या !

दिग्गजांनी केले आश्वस्त

    दिनांक :27-May-2026
Total Views |
न्यूयॉर्क
AI job cut मागील काही वर्षात एआयमुळे जगभरात धास्तावलेली स्थिती आहे. एआय अनेक क्षेत्रातील नोकऱ्या खाणार असे बोलले जाऊ लागले. तसे घडले देखील. मात्र, आता जगभरातील बड्या एआय कंपन्यांच्या सीईओंचे सूर काहीसे बदलले आहेत.
 

ai job cut 
 
AI job cut ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी म्हटले आहे की, एआयमुळे नोकरी धोक्यात येण्याची जी भीती व्यक्त केली जात होती त्या प्रमाणात फारसे काही घडलेले नाही. एआय सर्वप्रथम एंट्री लेव्हल ऑफिस जॉब्स खाणार, असे वाटत होते. पण, असे फार मोठ्या प्रमाणात घडलेले नाही. माझी याविषयीची भीती व्यर्थ ठरली, याचा मला आनंद आहे.
त्यांनी हेही म्हटले की, एआय तुमचे काम सोपे करत आहे. पण, तो मानवाची जागा घेऊ शकत नाही. मी स्वत: एआयला माझे काही मेसेज आणि माझ्या भावना लिहायला सांगितल्या. पण, नंतर समजले की, प्रत्यक्षात दोन जिवंत व्यक्तींचे बोलणे आणि त्यातून होणारी भावनिक देवाणघेवाण जास्त महत्त्वाची आहे. कोणत्याही नोकरीतील मानवीय भाग इतका महत्त्वाचा आहे की, त्याची जागा कोणतीही मशीन सहजासहजी कॉपी करू शकत नाही.
AI job cut  कपातीसाठी एआयचा बहाणा
दुसरीकडे, अमेरिकी टेक कंपनी एनविडीयाचे सीईओ जेन्सन हुआंग म्हणाले की, जे लोक एआय शिकतील आणि त्याच्या सोबत काम करतील ते पुढे जातील. पण, जे लोक नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यास कचरतील त्यांच्यासाठी धोका कायम आहे. एआय तुमची नोकरी खाणार नाही, पण काम करण्याची पद्धत नक्कीच बदलणार आहे. अनेक कंपन्या नोकर कपात करत आहेत आणि एआयचे कारण पुढे करत आहेत. हा त्यांच्यासाठी सोपा बहाणा झाला आहे. एआय अजून इतका प्रभावी नाही की अचानक जगभरातील नोकèयाच संपुष्टात आणेल. कंपन्यांनी असे बहाणे बनवणे बंद केले पाहिजे.