खरात भोंदुचा 'भूकंप' आता चित्रपटातून समोर येणार

    दिनांक :27-May-2026
Total Views |
नाशिक
Ashok Kharat नाशिकमधील वादग्रस्त म्हणून चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात कथित भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्याशी संबंधित घटनांवर आधारित कथानक मांडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पामुळे मराठी चित्रपटसृष्टीत आणि राजकीय वर्तुळातही उत्सुकता निर्माण झाली आहे.
 

Ashok Kharat 
या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू शकतात, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मात्र या भूमिकेबाबत अधिकृत पुष्टी अद्याप निर्मात्यांकडून करण्यात आलेली नाही.
या चित्रपटाविषयी Ashok Kharat  बोलताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की,बिग बॉस च्या घरातून बाहेर आल्यानंतरच त्यांना अशोक खरात प्रकरणाची सविस्तर माहिती मिळाली. या चित्रपटात त्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, समाजात अशा प्रकारच्या कथित भोंदूबाबांपासून सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. “अशा प्रकारचे व्यक्ती समाजात कुठेतरी लपून बसलेले असू शकतात, त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.तसेच, चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत त्यांनी अद्याप सस्पेन्स कायम ठेवला आहे. “माझी भूमिका नेमकी काय असेल हे मी सध्या सांगणार नाही, ते प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.