बीड
groom refused marriage बीड तालुक्यातील एका विवाह प्रकरणातून धक्कादायक प्रकार समोर आला असून ऐन लग्नाच्या काही दिवस आधी नवरदेवाने लग्नाला नकार दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे “मुलगी मला शोभत नाही” असे कारण देत लग्न मोडल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित नवरदेवाने पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचाही गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
ही घटना बीडमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर यांच्याशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या विवाहाची तयारी जोरात सुरू होती आणि लग्नाला अवघे ११ दिवस शिल्लक असताना अचानक त्यांनी लग्नास नकार दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या निर्णयामागे त्यांनी “मुलगी मला शोभत नाही” असे कारण पुढे केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुलीच्या कुटुंबीयांच्याgroom refused marriage म्हणण्यानुसार, या प्रकारादरम्यान सरकारी पिस्तुलचा धाक दाखवण्यात आला आणि त्यांना धमकावण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मानसिक धक्का बसल्याचा दावा करण्यात आला आहे. लग्नासाठी केलेला मोठा खर्च वाया गेल्याने आर्थिक नुकसानही झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.या प्रकरणावर मुलीचे वडील ज्ञानेश्वर जरांगे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, साखरपुड्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. लग्नाची तारीख जवळ आल्याने कपडे, भांडी, फर्निचर आणि इतर खरेदी यावरही मोठा खर्च करण्यात आला होता. एकूण खर्च १४ ते साडेचौदा लाख रुपयांपर्यंत गेल्याचा त्यांचा दावा आहे. ऐनवेळी लग्न मोडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रारी groom refused marriage दाखल करण्यात आल्या आहेत. मुलीच्या कुटुंबीयांनी चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे, नवरदेवाच्या बाजूनेही तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.“आमच्या मुलीला न्याय मिळावा आणि लग्नाच्या तयारीसाठी झालेला सर्व खर्च परत मिळावा,” अशी मागणी मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याशी संबंधित या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.