पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण उत्साहात

पुसद जिल्हा भाजपाचे आयोजन

    दिनांक :27-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
BJP training यवतमाळ येथे शनिवार, 23 व 24 मे रोजी पंडित दीनदयाल प्रबोधिनी येथे भारतीय जनता पार्टी पुसद जिल्ह्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण वर्ग अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा गाभा कार्यकर्त्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारे हे प्रशिक्षण शिबिर अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरले. कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार, 23 मे रोजी जिल्ह्याचे नेते, माजी मंत्री मदन येरावार यांनी केले.
 

BJP training camp Yavatmal, 
ही बाब शिबिरासाठी विशेष प्रेरणादायी ठरली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. उदघाटन प्रसंगी उमरखेड विधानसभा आमदार किसन वानखेडे, माजी आमदार नामदेव ससाने, माजी आमदार प्रकाश देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, विदर्भ संयोजक व जिल्हा प्रभारी दिनेश सूर्यवंशी, तसेच विदर्भ संयोजक नितीन भुतडा, जिल्हा अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, महामंत्री महेश काळेश्वरकर, महामंत्री अ‍ॅड. आदित्य माने, महामंत्री दत्तात्रय राहणे, माजी जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, महिला जिल्हा अध्यक्ष जयश्री राठोड, युवा जिल्हा मोर्चा अध्यक्ष रोहित वर्मा उपस्थित होते. या भव्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन पुसद जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या नेतृत्वात महामंत्री महेश काळेश्वरकर, अ‍ॅड. आदित्य माने आणि दत्तात्रय राहणे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले होते.
या प्रशिक्षण वर्गात प्रदेश BJP training प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, जयंत डेहणकर, आमदार संजय कुटे, विदर्भ संयोजक व जिल्हा प्रभारी दिनेश सूर्यवंशी, आमदार संजय भेंडे, प्रदेश प्रवक्ता विनोद वाघ, किरण पातुरकर, डॉ. नितीन खर्चे, राजू पडगिलवार यांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मार्गदर्शन केले.
 
 
भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय विचारधारा, एकात्म मानववाद, अंत्योदय, कार्यपद्धती, कार्यविस्तार, बूथ सक्षमीकरण, मन की बात अभियान, वक्तृत्व कला तसेच गरीब व वंचित घटकांसाठी राबविण्यात येणाèया योजनांवर नेत्यांनी सखोल मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांना नवी दिशा दिली.
कार्यासाठी समाज माध्यमांचे वाढते महत्त्व त्यांनी प्रभावी उदाहरणांसह स्पष्ट केले. कार्यक्रमात सांस्कृतिक आणि बौद्धिक उपक्रमांनाही तितकेच महत्त्व देण्यात आले. नगरसेवक कीर्ती राऊत यांनी अंताक्षरी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. तसेच त्यांनी सकाळी योग शिबिर घेऊन सर्वांना आरोग्यदायी जीवनशैलीचा अनुभव दिला. यावर्षी भाजपा नेतृत्वाने प्रत्येक जिल्ह्याने प्रशिक्षण वर्गात काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पुसद जिल्ह्याच्या वतीने एक अभिनव आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत प्रशिक्षण वर्गादरम्यान उपस्थितांची रक्त तपासणी करण्याचा उपक्रम घेतला. या उपक्रमांतर्गत आरोग्याच्या महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या.विशेष म्हणजे, तपासणी केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांच्या तपासणी अहवालांचे वितरण समारोप कार्यक्रमात करण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. तसेच संघटनात्मक कार्यासोबतच कार्यकर्त्यांच्या स्वास्थ्यालाही प्राधान्य दिले जाते, हा सकारात्मक संदेश देण्यात आला.
भाजपा पुसद जिल्ह्याचा हा उपक्रम प्रशिक्षण वर्गातील विशेष आकर्षण ठरला. या प्रशिक्षण शिबिरासाठी लक्ष्मीकांत मैड, सुरेश वाघ, प्रशांत आयचित, गोपाळ थोरात, अनिल बोलके, रोहित वर्मा, नितीन शेंदुरकर तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
प्रत्येक कार्यकर्त्याच्या योगदानामुळेच हा कार्यक्रम यशस्वितेच्या शिखरावर पोहोचला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशामागे सर्वांत महत्त्वाचे आणि मोलाचे योगदान जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांचे राहिले. त्यांचे कुशल नेतृत्व, नियोजन क्षमता आणि कार्यकर्त्यांप्रती आत्मीयतेमुळे हे शिबिर अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरले.