शिरपूर (बोके) येथे २९ लाख ५० हजारांचे बोगस बियाणे जप्त; एकाला अटक

    दिनांक :27-May-2026
Total Views |
आर्वी, 
bogus seeds खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असून जिल्ह्यात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचे अनधिकृत बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकर्‍यांची फसवणूक केली जाते. त्याच अनुषंगाने कृषी विभागाचे पथक लक्ष देऊन असून तालुयातील शिरपूर (बोके) येथे गोदामातून गुजरात राज्यातून आणलेले २९ लाख ४६ हजार ८४६ रुपयांचे एचटीबीटी बोगस बियाणे जप्त करण्यात आले. या प्रकरणी संजय गोपाळे (५२) रा. शिरपूर (बोके) याला अटक केली आहे.
 
 
 
bogus seeds
 
 
कृषी अधिकारी संजय बनमोटे यांनी संजय गोपाळे याने बोगस बी-बियाणे तयार करुन गोदामात साठवणूक केल्याची तक्रार आर्वी ठाण्यात दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान, पोलिसांनी संजय गोपाळे याला ताब्यात घेऊन गोदामाची पाहणी केली असता बोगस बियाणे आढळून आले. बियाण्याबाबत विचारपूस केली असता पनम अग्रोटेक बी-एच पटेल समाज, तारघडी राजकोट राजस्थान येथून बियाणे खरेदी केल्याचे सांगितले.bogus seeds त्यानंतर या बियाण्याची पॅकिंग करून विक्री केली. त्याच्या ताब्यातून २९ लाख ४६ हजार ८४६ रुपयांचे बियाणे जप्त करून गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत ढोले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सतीश डेहनकर, पोलिस कर्मचारी संतोष चव्हाण, दिगंबर रुईकर, अंकुश निचत, ऋषिकेश घंगारे, सुरजसिंग बावरी, सागर पाचोडे, सूरज रिते, संजय बोकडे, बालाजी मस्के, प्रशांत नरबरीया यांनी केली.