तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
bulldozers roll in pandharkawada शहरातील नगर परिषद हद्दीत अतिक्रमित जागेवर मागील 25 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला अवैध कत्तलखाना प्रशासनाने अखेर जेसीबीच्या सहाय्याने पाडला. या कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
स्थानिक स्मशानभूमी रस्त्यावर असलेल्या या कत्तलखान्याबाबत परिसरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. दुर्गंध, अस्वच्छता तसेच पर्यावरणीय परिणामांबाबत अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र अनेक तक्रारी होऊनही या कत्तलखान्यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. या अवैध व्यवसायावर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा शहरात सुरू होती.bulldozers roll in pandharkawada अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत बुलडोझरच्या साह्याने बांधकाम हटवले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शहरातील इतर अतिक्रमणांवरही अशाच प्रकारची कारवाई करण्याची मागणी होत आहे.