ईडीच्या कारवाईवरून केरळमधील पूर्व CM यांच्या निवासस्थानी गोंधळ

    दिनांक :27-May-2026
Total Views |
केरळ,
cm pinarayi vijayan केरळचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते पिनारयी विजयन यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तिरुवनंतपुरम आणि कन्नूर येथे झालेल्या या घडामोडींमुळे सीपीआय(एम) कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, केंद्र सरकारवर विरोधकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला जात आहे.
 

cm pinarayi vijayan 
 
 
 
ईडीचे अधिकारी तपासाची प्रक्रिया पूर्ण करून निवासस्थानातून बाहेर पडत असताना परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. सीपीआय(एम)च्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना गेटबाहेर अडवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी धक्काबुक्की आणि तणावपूर्ण वातावरणही निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पक्षाचे स्थानिक नेते आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ सुरू असलेल्या गोंधळानंतर अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
या घटनेनंतर सीपीआय(एम)ने केंद्र सरकार आणि ईडीवर जोरदार टीका केली आहे. पक्षाचे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. दिल्लीसह देशातील विविध राज्यांमध्ये विरोधी नेत्यांवर करण्यात आलेल्या कारवायांचा उल्लेख करत त्यांनी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या प्रकरणांचाही संदर्भ दिला.
 
एम. ए. बेबी यांनी आरोप केला की, ईडी आता स्वतंत्र तपास यंत्रणा म्हणून काम करत नसून केंद्र सरकारच्या राजकीय अजेंड्याचा भाग बनली आहे.cm pinarayi vijayan विरोधी पक्षांना दबावाखाली आणण्यासाठी आणि त्यांच्यात भीती निर्माण करण्यासाठी अशा कारवाया केल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, या कारवाईनंतर केरळमध्ये विविध ठिकाणी सीपीआय(एम) कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. लोकशाही संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे केरळच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, पुढील काही दिवसांत हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.