पुणे
cockroach DNA जैवविविधतेच्या अभ्यासात आणि सूक्ष्म जीवसृष्टीच्या ओळखीत भारताने महत्त्वपूर्ण प्रगती साधत झुरळ प्रजातींसाठी देशातील पहिली आणि सर्वात मोठी ‘डीएनए बारकोड’ संदर्भ लायब्ररी विकसित केली आहे. पुण्यातील संशोधकांच्या सहभागातून झालेल्या या अभ्यासामुळे झुरळांसारख्या सामान्यतः उपेक्षित मानल्या जाणाऱ्या कीटकांच्या जैवविविधतेबाबत नवी माहिती समोर आली आहे. या संशोधनामुळे भारतातील जैवविविधता दस्तऐवजीकरणाला नवे परिमाण मिळाले असून पर्यावरणीय निरीक्षणासाठीही हे महत्त्वाचे साधन ठरणार आहे.
झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ZSI) च्या पुणे आणि चेन्नई येथील प्रादेशिक केंद्रांतील वैज्ञानिक तसेच पुण्यातील रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील संशोधकांच्या संयुक्त पथकाने हा अभ्यास केला आहे. या संशोधनात १०० पेक्षा अधिक डीएनए बारकोड तयार करण्यात आले असून त्याच्या आधारे काकरोच प्रजातींचे अचूक वर्गीकरण करण्यात आले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय ‘झूटॅक्सा’ या संशोधन नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.संशोधकांच्या मते, काकरोच हे केवळ घरगुती कीटक किंवा ‘कीटक’ म्हणून ओळखले जात असले तरी प्रत्यक्षात त्यातील बहुतांश प्रजाती निसर्गसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात. सेंद्रिय पदार्थांचे विघटन, पोषक तत्त्वांचे पुनर्चक्रण आणि जंगलातील अन्नसाखळी टिकविण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. तसेच पर्यावरणातील बदलांना अत्यंत संवेदनशील असल्यामुळे हे कीटक परिसंस्थेच्या आरोग्याचे महत्त्वाचे निर्देशक (बायोइंडिकेटर)cockroach DNA मानले जातात.
या संशोधनात ‘डीएनए बारकोडिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून प्रजातींची ओळख पटविण्यात आली. या पद्धतीत डीएनएतील लहान, प्रमाणित अनुक्रमांचा वापर करून कोणत्याही प्रजातीची जलद आणि अचूक ओळख करता येते. पारंपरिक वर्गीकरण पद्धती आणि आधुनिक आण्विक तंत्रज्ञान यांचा संगम करून संशोधकांनी अनेक अस्पष्ट व वादग्रस्त प्रजातींचे वर्गीकरण स्पष्ट केले आहे. तसेच काही स्थानिक व दुर्मिळ वंशपरंपरा भारतातच विकसित झाल्या असल्याचेही अभ्यासातून सूचित झाले आहे.या प्रकल्पामुळे भारतातील कीटक जैवविविधतेचे व्यापक डीएनए डेटाबेस तयार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. भविष्यात पर्यावरणीय देखरेख, कृषी कीटक नियंत्रण, जैवसुरक्षा आणि संशोधन क्षेत्रात या ‘रेफरन्स लायब्ररी’चा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, झूलॉजिकल cockroach DNA सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार देशभरात मोठ्या प्रमाणावर डीएनए बारकोडिंग प्रयोगशाळा विकसित होत असून हजारो प्रजातींचे जैविक नोंदणीकरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील हे संशोधन भारतीय जैवविविधता संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.