कोल्हापूर
Transgender आपत्तीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने मदतीसाठी पुढे यावे, या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम आता पूरस्थितीत बचावकार्य करण्यासाठी सज्ज होत आहे.
Transgender जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्या उपस्थितीत राजाराम तलाव येथे तृतीयपंथीयांसाठी विशेष पूर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात ‘मैत्री’ तृतीयपंथीय संघटनेच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
Transgender प्रशिक्षणादरम्यान मोटरबोट चालविणे, पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढणे, पाण्यात बुडालेल्या व्यक्तींना प्रथमोपचार देणे, आपत्कालीन बोट तयार करणे व तिचे व्यवस्थापन करणे अशा विविध महत्त्वाच्या बाबींचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. या दोन दिवसीय प्रशिक्षणामुळे तृतीयपंथीय सदस्यांना आपत्तीच्या काळात प्रत्यक्ष मदतकार्य करण्याचे कौशल्य प्राप्त होणार आहे.