मुंबई/पुणे
Daund–Manmad railway line दौंड–मनमाड रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दुहेरीकरण कामामुळे प्रवाशांच्या प्रवास नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विसापूर–रांजणगाव–सरोळा या विभागात हे काम वेगाने सुरू असून, या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 26 ते 30 मे या कालावधीत अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून काही गाड्या रद्द तर काहींचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
भारतीय रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी आणि क्षमतेत वाढ करण्यासाठी हे दुहेरीकरणाचे काम अत्यावश्यक आहे. मात्र या कामामुळे प्रवासी वाहतुकीवर तात्पुरता परिणाम होत असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.27 ते 29 मे दरम्यान काही महत्त्वाच्या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अमरावती–पुणे एक्स्प्रेस, पुणे–अमरावती एक्स्प्रेस, झाशी–हडपसर स्पेशल, हडपसर–झाशी स्पेशल तसेच पुणे–नागपूर आणि नागपूर–पुणे या गाड्यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे पुणे, नागपूर आणि विदर्भातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तसेच 30 मे दरम्यान काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. हावडा–पुणे एक्स्प्रेस, हडपसर–बनारस एक्स्प्रेस, जम्मूतवी–पुणे एक्स्प्रेस, निजामाबाद–पुणे एक्स्प्रेस, दौंड–निजामाबाद एक्स्प्रेस, हडपसर–नांदेड एक्स्प्रेस यांसह अनेक गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. नांदेड–हडपसर एक्स्प्रेस, केएसआर बेंगळुरू–नवी दिल्ली एक्स्प्रेस, दादर–साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी–दादर एक्स्प्रेस, यशवंतपूर–चंदीगड एक्स्प्रेस, पुणे–गोरखपूर एक्स्प्रेस, हुबळी–निजामुद्दीन एक्स्प्रेस आणि निजामुद्दीन–वास्को एक्स्प्रेस या गाड्यांचाही यात समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाने Daund–Manmad railway line प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी प्रवास करण्यापूर्वी अधिकृत माहितीची खातरजमा करावी. अधिकृत संकेतस्थळ किंवा हेल्पलाइनद्वारे गाडीची अद्ययावत स्थिती तपासल्याशिवाय प्रवासाचे नियोजन करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या तात्पुरत्या बदलांमुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय होणार असली तरी भविष्यात रेल्वे सेवेत सुधारणा आणि अधिक सुलभता निर्माण होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.