डिझेल टंचाईमुळे शेतीकामे ठप्प; पेरणी हंगामावर संकटाचे सावट

    दिनांक :27-May-2026
Total Views |
बोरी
diesel shortage परिसरात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे शेतीकामांवर मोठा परिणाम झाला असून मशागतीची कामे लांबणीवर पडत आहेत. आगामी दहा ते पंधरा दिवसांत पेरणी हंगाम सुरू होणार असताना डिझेल उपलब्ध न झाल्यास शेती उत्पादन प्रक्रियेवर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
 

diesel shortage  
बोरी परिसरात ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाणारी नांगरणी, कुळवणी तसेच इतर मशागतीची बहुतांश कामे सध्या ठप्प झाली आहेत. डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी आणि वाहनधारकांना रखरखत्या उन्हात पेट्रोल पंपांवर दीर्घकाळ रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेकदा प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांकडून पुढील दोन ते तीन दिवस पुरेल इतका साठा करून ठेवण्याकडे कल वाढला आहे. यामुळे मागणी अचानक वाढून बाजारातील तुटवडा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी सामान्य ग्राहक आणि शेतकरी दोन्ही घटकांना diesel shortage प इंधन मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.दरम्यान, जिल्हास्तरावरून डिझेल व पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवरील परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. या परिस्थितीमुळे आगामी पेरणी हंगाम वेळेत सुरू होणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.