तभा वृत्तसेवा
दिग्रस, 27 मे
Vaibhav Navare शहरातील वैभवनगर परिसरात मंगळवार, 26 मे रोजी कुटुंबाचा आधार असलेल्या एका 32 वर्षीय युवकाने घरातील पाळणा असलेल्या नायलॉन दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने चांगलीच खळबळ उडाली.
वैभव संतोष नवरे असे मृत युवकाचे नाव आहे. वैभव हा दूध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याची पत्नी मुलीसह माहेरी गेली होती. घरात आई-वडील उपस्थित होते. दुपारच्या सुमारास वैभव आपल्या खोलीत असल्याने तो विश्रांती घेत असावा असा कुटुंबियांचा समज होता.मात्र दुपारी 1 च्या दरम्यान नातेवाईकांनी घरात पाहणी केली असता वैभव दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. त्याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाèयांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वैभवच्या मागे आई, वडील, पत्नी व एक चिमुकली मुलगी असा परिवार आहे.