पाण्याच्या टाकीत बुडून दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

    दिनांक :27-May-2026
Total Views |
सेलू,
selu news तालुक्यातील कोलगाव शेतशिवारात जनावरांसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडून पल्लवी निलेश कुमार या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.
 
 
selu news
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कोलगाव येथील शेतशिवारात असलेल्या निळकंठ वरटकर यांच्या पोल्ट्री फार्मवर मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील जमुनिया केसरी येथील काही मजूर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दुपारच्या सुमारास शेतातील घरासमोरील अंगणात काही लहान मुले खेळत होती. खेळता-खेळता चिमुकली पल्लवी जनावरांसाठी ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेली. तिचा तोल जाऊन ती टाकीत पडली. दरम्यान, काही वेळानंतर मजुरांनी टाकीजवळ पाहणी केली असता पल्लवी पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आली.selu news तिला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सेलू पोलिस करीत आहेत.