केरळमध्ये १० ठिकाणी ईडीची धडक कारवाई

    दिनांक :27-May-2026
Total Views |
तिरुवनंतपुरम,
ED Action in Kerala अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केरळमध्ये मोठी कारवाई करत सुमारे १० ठिकाणी छापे टाकले असून या कारवाईचा संबंध मनी लाँडरिंग प्रकरणाशी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात केरळचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते पिनारयी विजयन यांच्या कुटुंबाशी संबंधित काही मालमत्तांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः त्यांच्या मुलगी वीणा विजयन आणि त्यांच्या कंपनीशी संबंधित व्यवहारांवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
 
 
 
de
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण वीणा विजयन यांच्या एक्झालॉजिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांभोवती फिरत आहे. या कंपनीने कोचीस्थित कोची मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेडसोबत केलेल्या करारांतर्गत कोणतीही ठोस सेवा न देता मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारल्याचा आरोप तपासात नमूद करण्यात आला आहे. २०१७ मध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर आणि मार्केटिंग सेवांसाठी करार झाल्याची माहिती असून, प्रत्यक्षात अपेक्षित सेवा पुरवल्या गेल्या नाहीत, असा दावा तपास यंत्रणांकडून केला जात आहे.