बुरशी-जीवाश्म शेवाळांना मिळाली जागतिक ओळख

* जैविक कुळ-नावांना मान्यतेचा डॉ. देशमुख यांचा दावा

    दिनांक :27-May-2026
Total Views |
चंद्रपूर,
fossil algae कवकशास्त्र आणि जीवाश्म शैवालांच्या वर्गीकरणशास्त्रात चंद्रपूरचे प्राध्यापक डॉ. उमाकांत देशमुख केलेल्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, ‘अंबेल्युसेसी’ आणि ‘वेसिक्युलोस्ट्रोमॅटेसी’ या त्यांच्या दोन नवीन जैविक कुळ-नावांचा जागतिक वैज्ञानिक समुदायाने स्वीकार केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
 
fossil algae
 
येथील जनता महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. उमाकांत देशमुख यांनी, कवक वर्गासाठी ‘अंबेल्युसेसी यूबी देशमूख’ हे नवीन कुळनाव प्रस्तावित केले असून, ते न्यूझीलंडमधील प्रतिष्ठित ‘फायटोटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. यापूर्वी अस्तित्वात असलेले ‘अ‍ॅग्रिकोमायसेटेस’ हे नाव आंतरराष्ट्रीय नामकरण नियमांनुसार अवैध ठरल्यानंतर त्यांनी सखोल अभ्यास करून, नवीन वैध नाव सुचविले. हे कुळ वर्ग ‘अ‍ॅग्रिकोमायसेटेस’ आणि ‘बासिडिओमायकोटा’ संघातील कवकांशी संबंधित असून, त्याची अधिकृत नोंद जागतिक स्तरावरील ‘मायकोबँक’(एमबी 863597) मध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कुळाचा प्रकार वंश ‘अंबेल्युस’ असून, त्याची प्रकार प्रजाती ‘अंबेल्युस सायनेसिस’ आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
डॉ. देशमुख यांनी, पेरू येथील संशोधक ‘एड्यूरडो ए. मोलिनारी-नोवोआ’ यांच्या सहकार्याने जीवाश्म निळ्या-हिरव्या शैवालांवरही संशोधन केले. या संशोधनातून ‘वेसीक्यूलोस्ट्रोमेटेसी यु. बी. देशमूख अ‍ॅन्ड मोलिनारी’ हे नवीन कुळनाव प्रस्तावित करण्यात आले असून, ते आयर्लंडमधील ‘यूनिव्हर्सिटी गालवे’ अंतर्गत प्रसिद्ध होणार्‍या ‘नोटुलाई अल्गारम’ या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. पूर्वी अस्तित्वात असलेले ‘वेसिक्युलराईसी’ हे नाव अवैध ठरल्यानंतर नव्या वैज्ञानिक नियमांनुसार हे वैध नामकरण करण्यात आले.fossil algae तसेच ‘वेसिक्युलोस्ट्रोमा’ या जीवाश्म शैवाल वंशातील चार प्रजातींसाठी नवीन वैज्ञानिक संयोजनांची नोंदही करण्यात आली आहे. या यशाबद्दल डॉ. देशमुख यांनी, रॉयल बोटॅनिक गार्डन्स, एडिनबर्ग येथील डॉ. जॉन मॅकनिल, हार्वर्ड युनिव्हर्सिटी हर्बेरिया येथील डॉ. कांची गांधी तसेच जर्मनीतील वेस्टरडिजेक फंगल बायोडाव्हर्सिटी इंस्टिट्यूट मधील मायकोबँक क्युरेटर कोंस्टेंज बेश्‍नच यांचे आभार मानले आहेत.