वर्धेतील अनेक प्रभागांत घंटागाडी गायब

*स्वच्छता अभियानाला सुरुंग

    दिनांक :27-May-2026
Total Views |
वर्धा,
garbage collection vans missing स्वच्छ भारत अभियानाचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्या अनुषंगाने भारतभर वर्धा नगरपालीकेसह सर्वत्र घंटागाड्या दिल्या गेल्या. कोट्यवधीचे कंत्राट नाशिक येथील कंत्राटदाराला दिले. त्याकरिता ३०० ते ७५० रुपये कर लावला. मात्र, वर्धा नगरपालिका प्रशासन प्रत्येक प्रभागांत नियमीत घंटागाडी दररोज पुरविण्यात अपयशी ठरली असल्याचा आरोप नगरसेवक यशवंत झाडे यांनी केला आहे.
 

garbage collection vans missing 
 
 
घंटा गाड्यातून ओला-सुका कचरा संकलन करणे, तो कचरा डेपोवर नेऊन प्रक्रीया करून खत तयार करणे. त्याकरिता घंटागाडी ड्रायव्हर, त्याचा सहाय्यक, गाडी मेन्टेनन्स, कचरा डेपोवर ५०-६० महिलांना कोट्यावधीची मशिनरी सरकारने पुरविली. २० प्रभागांत प्रत्येकी एक प्रमाणे दररोज ३६५ दिवस घंटागाडी यावयास पाहिजे. काहीच महिने ही योजना व्यवस्थीत चालली. नागरिकांना केंद्र सरकारचे आणि घंटागाडीवरील भोंग्यावर वाजणारे गाडीवाला आया घरसे कचरा निकाल हे गाणे सकाळीच कानी पडायचे. आवाज ऐकताच कचर्‍याची बकेट घेवुन घराबाहेर पडायचे. वर्धा नगरपालिकेने ओला सुका कचरा संकलनाकरिता हिरवी-निळी बकेटही वितरीत केली होती.
 
आज मात्र वर्धा शहरांत घंटागाडीच्या भोंग्याचा आवाजच बंद झाला. कचरा संकलन बंद किंवा अनियमीत झाल्याने रस्त्यावर, घरामागील गल्लीत टाकतात. परिणामी शहरातील सर्वच गल्लया, रोडशेजारी कचर्‍याने भरलेल्या दिसतात. तोच कचरा नाल्यांमध्ये जावुन नाल्याही बुजू लागल्या. परिणामी, शहराचे सौंदर्य बिघडले असुन स्वच्छ वर्धा शहर अस्वच्छ झाले आहे.
दररोज २० घंटागाड्या ऐवजी १० गाड्या निघतात अनेक गाड्यांना भोंगा नाही, असला तर चालु-बंद राहतो. ड्रायव्हर आहे तर असिसटंट नाही. कंत्राटदाराचे लाखो रुपयाचे बीले मात्र प्रशासन नियमीत काढते. करारा प्रमाणे पहिल्या-दुसरे वेळी दंडात्मक कारवाई दाखविली जाते. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे गौडबंगाल न.प. प्रशासनाच्या संगणमताने होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
कराराप्रमाणे घंटागाड्यांची नियमीत सर्व्हीसींग-धुलाई कधी होत नाही. त्यामुळे घंटागाडीला प्रचंड वास सुटतो. जुन्या कंत्राटदाराने तर नवीन आलेली घंटागाड्या भंगार करुन भंगार संपल्यावर नगरपालिकेला दिल्या. नगर पालीकेने कोणतीही वसुली केली नाही. अनेक मजुराचे-महिलांचे मजुरीचे, प्राव्हीडंट फंड कपातचे लाखो रुपये बुडविले. विद्यमान कंत्राटदाराचीही तीच वाटचाल सुरू आहे. नप आरोग्य विभागाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होते अशी चर्चा शहरात आहे.garbage collection vans missing प्रभाग १३ झावरा जीन, कृष्णनगर, पोद्दार बगीचा गुरुव्दारा, जैन मंदिर, एसटी डेपो, रेल्वे स्टेशन, बजाज चौक, मोहता जिन भागात जर नियमीत घंटागाडी आली नाही तर प्रभागातील टेम्पोभर कचरा मुख्याधिकारी व आरोग्य विभाग प्रमुखांस सप्रेम भेट देण्यात येईल असा इशारा नगरसेवक यशवंत झाडे यांनी दिला आहे.