आरमोरी,
Gadchiroli district गेल्या अनेक वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील एकाही व्यक्तींना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली नसल्याने आगामी होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातीलच कोणाच्याही पक्षातील उमेदवारांना विधान परिषदेची संधी देण्यात यावी व जिल्ह्याला विधान परिषदेवर नेतृत्व करण्याचा मान मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 1 जून पासून नामांकन भरण्याची तारीख असून 18 जुन रोजी निवडणूक आहे. गडचिरोली जिल्ह्याला आतापर्यंत विधानपरिषदेत दुय्यम स्थान मिळाले असून, जिल्ह्यातील पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या धनदांडग्या, व्यावसायिक किंवा प्रभावशाली व्यक्तींना उमेदवारी दिली जाते, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. Gadchiroli district तिन्ही जिल्ह्यांचे मिळून मतदार असल्याने, गडचिरोलीतील स्थानिक प्रश्नांपेक्षा बाहेरील राजकीय प्रभाव आणि आर्थिक समीकरणे वरचढ ठरतात. त्यामुळे जिल्ह्यातीलच कोणत्याही पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी मडावी यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्हयाची निर्मिती 1982 ला झाली. 1982 नंतर राज्यपालाच्या कोठ्यातून स्व. इंदुताई नाकाडे या विधानपरिषदेवर तर आमदार कोठयातून विजय वडेटटीवार हे विधानपरिषदेवर गेले होते. Gadchiroli district तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्याला विधानपरिषदेवर स्थान मिळाले नाही. पदवीधर, शिक्षक तसेच विधानसभेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत जिल्ह्याच्या वाट्याला कुठलाच प्रतीनीधी मिळाला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नेत्यांना किंवा बाहेरील उमेदवारांना पसंती दिली जाते.
जर विधानपरिषदेला जिल्ह्याच्या व्यतिरीक्त इतर जिल्ह्यातील बाहेरील उमेदवार मिळत असेल तर सर्व पक्षांनी एकत्र येवून कोणत्याही पक्षाचा उमेदवार हा गडचिरोली जिल्ह्यातीलच देण्यात यावा, यासाठी लढावे. तसेच विधान परिषदेत राज्यपालांकडून एकूण 12 नामनिर्देशित सदस्य विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ असतात. सध्या जिल्ह्यात एका नाटक कलावंताच्या नावाची चर्चा राज्यपाल कोठ्यातून होत असली तरी यापेक्षाही आपल्या जिल्ह्यात अनेक नामवंत व ख्यातनाम नावे आहेत. Gadchiroli districtत्यांची चर्चा होणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवाही काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बि. टी. सेलोकर यांनीही आपले मत मांडले. पत्रपरिषदेला माजी आमदार तथा राकाँचे जेष्ठ नेते डॉ. रामकृष्ण मडावी यांच्यासह माजी जिल्हा नियोजन समिती सदस्या कल्पना तिजारे, विधानसभा सहअध्यक्ष सुनील नंदनवार, तालुकाध्यक्ष बि. टी. सेलोकर, रामदास दहिकर आदी उपस्थित होते.