नवी दिल्ली
hydrogen train India भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत रेल्वे बोर्डाने देशातील पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पर्यावरणपूरक आणि शून्य कार्बन उत्सर्जन करणाऱ्या रेल्वे वाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही नवी हायड्रोजन रेल्वे 10 डब्यांची असेल आणि ती जास्तीत जास्त 75 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणार आहे. या रेल्वेचा प्रारंभिक प्रवास दिल्ली विभागातील जिंद–सोनीपत या मार्गावर करण्यात येणार आहे. याच मार्गावर हायड्रोजन सेल इंधनावर आधारित DPRS 1200 KW DEMU या ट्रेनची यापूर्वी यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.रेल्वे बोर्डाने 22 मे 2026 रोजी उत्तर रेल्वेला पाठवलेल्या पत्राद्वारे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयानंतर आता प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याच्या तयारीला वेग आला आहे. तथापि, ट्रेन नियमित प्रवाशांसाठी कधी उपलब्ध होईल याबाबतची अंतिम तारीख अद्याप hydrogen train India निश्चित करण्यात आलेली नाही.ही हायड्रोजन रेल्वे शून्य कार्बन उत्सर्जन करणारी असल्याने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ती एक मोठी क्रांती मानली जात आहे. या तंत्रज्ञानामुळे डिझेल आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवरील अवलंबित्व कमी होऊन भविष्यात हरित रेल्वे वाहतुकीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांत वेग वाढ, सुरक्षितता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या समावेशासाठी सातत्याने प्रयत्न केले असून हायड्रोजन ट्रेनचा प्रकल्प हा त्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.