मुंबई
heavy rain देशभरातील हवामानात मोठे आणि अस्थिर बदल दिसून येत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) 27 मे 2026 रोजी 17 राज्यांमध्ये वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. काही भागांमध्ये ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पुढील काही दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशातील अनेक भागांमध्ये एकाच वेळी तीव्र उष्णता आणि दुसरीकडे वादळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असून अचानक होणाऱ्या हवामान बदलांमुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशात आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा अधिक गंभीर मानला जात आहे.
विदर्भात मात्र उष्णतेचा heavy rain कहर कायम आहे. ब्रह्मपुरी येथे तब्बल 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून संपूर्ण परिसरात उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. विदर्भमध्ये भारतीय हवामान विभागाने वर्धा, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये आजही तीव्र उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.दरम्यान, नागपूर, गडचिरोली आणि अकोला जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळेत अत्यंत गरम वारे आणि उकाड्यामुळे रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या घटल्याचे चित्र आहे.अकोला जिल्ह्यात नवतपाच्या सुरुवातीपासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असून काल 45.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर आजही ते 44 अंशांच्या आसपास राहिले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त असून उष्ण वाऱ्यांमुळे आरोग्य समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.नंदुरबार जिल्ह्यातही वाढत्या उन्हाचा मोठा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्दी, खोकला, ताप, उलटी-जुलाब आणि न्यूमोनियासारख्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.
दुसरीकडे कोकण आणि मराठवाड्यात heavy rain वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून अचानक होणाऱ्या पावसामुळे शेती आणि दैनंदिन जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.हवामानातील या दोन टोकाच्या परिस्थितीमुळे—एकीकडे तीव्र उष्णता आणि दुसरीकडे वादळी पाऊस—राज्यात आणि देशात पुढील काही दिवस आव्हानात्मक ठरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.