कारगिल योद्धा विष्णू रेखे यांना सैनिक रत्न पुरस्कार जाहीर

सैनिक फेडरेशनने केली निवड

    दिनांक :27-May-2026
Total Views |
वाशीम,
Kargil War Veteran Vishnu Rekhe सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘सैनिक रत्न पुरस्कार २०२६’ रिसोड तालुयातील आसेगाव पेन येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त हवालदार विष्णू पी. रेखे यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या उल्लेखनीय सैनिकी सेवेची आणि सेवानिवृत्ती नंतरही सुरू असलेल्या राष्ट्रसेवेची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
 
 
Vishnu Rekhe
 
२८ ऑटोबर १९९६ रोजी भारतीय सैन्याच्या २७० इंजिनिअर रेजिमेंट मध्ये भरती झालेल्या रेखे यांनी तब्बल १८ वर्षे देशसेवा बजावली. या कालावधीत त्यांनी जम्मू-काश्मीर, नगरोटा, श्रीनगर, कारगिल, आसाम, अरुणाचल प्रदेश, गुजरात आणि पंजाब यांसारख्या दुर्गम व संवेदनशील भागात आपले कर्तव्य बजावले.  Kargil War Veteran Vishnu Rekhe ऑपरेशन विजय अंतर्गत झालेल्या कारगिल युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून शौर्याचे दर्शन घडवले. याशिवाय गुजरातमधील महापुराच्या वेळी त्यांनी रेस्यू ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 
 
त्यांच्या या समर्पित सेवेबद्दल त्यांना ऑपरेशन विजय मेडल, ऑपरेशन स्टार, स्पेशल सर्विस मेडल, ऑपरेशन रक्षक मेडल, लाँग सर्विस मेडल, हाय अल्टिट्यूड मेडल, सेना सेवा मेडल यांसारख्या अनेक सन्माननीय पदकांनी गौरविण्यात आले आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांची राष्ट्रसेवा थांबली नाही. Kargil War Veteran Vishnu Rekhe एप्रिल २०१६ मध्ये त्यांची नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमध्ये मास्टर ट्रेनर प्रशिक्षणासाठी लंडन येथे निवड झाली. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त केले. सध्या ते मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस पुलगाव येथे कार्यरत असून आपल्या अनुभवाचा उपयोग देशसेवेसाठी करत आहेत. हवालदार विष्णू रेखे यांच्या या गौरवामुळे वाशीम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.