‘लाेकाेत्तर’ गाैरव विशेषांकाचे प्रकाशन

गडकरींच्या ‘राजकारणातून समाजकारणाकडे’ प्रवासाचा प्रेरणादायी वेध

    दिनांक :27-May-2026
Total Views |
नागपूर,
lokottar देशाच्या विकासाला नवी दिशा देतानाच समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी जिव्हाळ्याचे नाते जाेडणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड, नागपूरच्या दै. तरुण भारतर्ते प्रकाशित करण्यात आलेल्या ‘लाेकाेत्तर - राजकारणातून समाजकारणाकडे’ या विशेष गाैरवांकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडले.
 
 
‘लाेकाेत्तर’ गाैरव विशेषांकाचे प्रकाशन
 
 
यंदाचा ‘लाेकाेत्तर’ विशेषांक हा नितीन गडकरी यांच्या राजकीय नेतृत्वाबराेबरच त्यांच्या समाजकारणातील व्यापक याेगदानाचा वेध घेणारा ठरला आहे. देशभरात महामार्ग, द्रुतगती मार्ग आणि पायाभूत सुविधांच्या विकासातून नवा आदर्श निर्माण करणाèया गडकरी यांनी ग्रामविकास, शिक्षण, आराेग्य, शेती, उद्याेग, साहित्य, संस्कृती, क्रीडा, मनाेरंजन तसेच भक्ती-अध्यात्म अशा विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याचा या विशेषांकातून सविस्तर वेध घेण्यात आला आहे.
 
सामान्य माणसाशी असलेला जिव्हाळा, विकासाकडे पाहण्याची दूरदृष्टी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व यामुळेच ते आज ‘विकासपुरुष’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यातील सामाजिक भान, संवेदनशीलता आणि लाेकाभिमुख दृष्टिकाेनाचे विविध पैलू या विशेषांकातून वाचकांसमाेर उलगडले आहेत.lokottar अंक प्रकाशन प्रसंगी श्री नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष पद्मश्री डाॅ . विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, तरुण भारतचे प्रबंध संचालक धनंजय बापट, श्री नरकेसरी प्रकाशन संचालक मंडळातील अशाेक मानकर, संदीप पाेशट्टीवर , समीर गाैतम, आशिष बडगे, मीरा कडबे, महाव्यवस्थापक देवेंद्र टाेणपे यांच्यासह जाहिरात विभागातील कर्मचारी उपस्थित होते . अंकाचे अवलाेकन करून ना. गडकरींनी लाेकाेत्तरचे काैतुक केले.