सिंदी (रेल्वे),
Water Scarcity शहरातील वार्ड १३ व १४ मधील नागरिकांनी मुख्याधिकार्यांना पाणी समस्येबाबत आज बुधवार २७ रोजी निवेदन देत शुद्ध व नियमित पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. अनेक दिवसांपासून शहराच्या विविध प्रभागांमध्ये तिसर्या दिवसांऐवजी चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. अनेक वार्डातील नळांना पुरेशा दाबाने व शुद्ध पाणी येत नसल्याची सामूहिक तक्रार नागरिकांनी आज केली.
३५ लाख रुपये या योजनेवर नुकतेच खर्च झाल्याची चर्चा आहे! पण, समस्या अद्याप सुटली नसल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना कराव्यात, गैरव्यवहारात लिप्त अधिकारी व कर्मचार्यांची गय करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. Water Scarcity यावेळी भाजपाचे नगरसेवक घनश्याम मेंढे यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच प्रभारी मुख्याधिकारी लंकेश गावंडे यांच्याशी चर्चा केली.