राष्ट्रवादीच्या बैठकीत अंतर्गत मतभेदांचे संकेत

तटकरे–पटेल अनुपस्थितीवर चर्चा तापली

    दिनांक :27-May-2026
Total Views |
मुंबई
NCP मुंबईतील देवगिरी बंगल्यावर मंगळवारी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पक्षांतर्गत घडामोडी आणि काही नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)मधील वरिष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे विशेष चर्चेचा विषय ठरले.
 

NCP 
मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल पटेल यांनी बैठकीला अनुपस्थिती दाखवल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली. त्यांच्या गैरहजेरीमागील कारण काय, यावर चर्चा रंगत असतानाच मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे.
 
 
हसन मुश्रीफ यांनी NCP  माध्यमांशी बोलताना सांगितले की, प्रफुल पटेल बैठकीला वैयक्तिक कामानिमित्त उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच काही मुद्द्यांवरून पूर्वी त्यांच्या आणि तटकरे यांच्या भूमिकांवर टीका झाली होती, मात्र त्यावेळी संपूर्ण पक्ष एकसंध होता आणि अंतर्गत मतभेदांपेक्षा संघटनात्मक एकता महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सध्या जे काही सुरू आहे ते क्षणिक आहे आणि शेवटी सर्व गोष्टी शांत होतील,” असेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, बैठकीत बोलताना सुनील तटकरे यांनी पक्षातील अंतर्गत भूमिकांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, पक्षाच्या कठीण काळात त्यांनी आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, मात्र त्यानंतर टीका सुरू झाल्यावर पक्षातील इतर नेत्यांकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही.तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरही आपली खंत व्यक्त केली. या मुद्द्यावरून आपण आणि प्रफुल पटेल सातत्याने टीकेचे लक्ष्य ठरलो, मात्र पक्षातील इतर नेत्यांनी आपली बाजू मांडली नाही, असा त्यांचा आरोप होता.
 
 
 
त्यांच्या या वक्तव्यामुळे बैठकीत NCP  काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे समजते.या चर्चेदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. “जे झाले ते झाले, आता पुढे जाण्याची गरज आहे,” असे सांगत त्यांनी चर्चेला आळा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तटकरे यांनी आपली भूमिका पुढेही मांडल्याने बैठकीत काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जाते.दरम्यान, या चर्चेदरम्यान पार्थ पवार बैठक सुरू असतानाच सभागृहातून बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात आणखी चर्चा रंगल्या आहेत. पक्षातील या घडामोडींमुळे अंतर्गत मतभेदांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील काळात नेतृत्व या मुद्द्यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.