‘नीट’ घोटाळा आणि पीकविम्यावरून युवक काँग्रेस आक्रमक

    दिनांक :27-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव,
NEET ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहार व यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा नुकसान भरपाईतून वगळल्याच्या मुद्यावरून बाभुळगाव तालुका युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत विद्यार्थी व शेतकèयांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
 

 NEET paper leak protest 
या निवेदनात ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाला शिक्षण व्यवस्थेवरील गंभीर आघात ठरवत संताप व्यक्त करण्यात आला. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाèया लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाèयांवर कठोर कारवाई करावी, तसेच यातील परीक्षा माफिया आणि कथित राजकीय संरक्षणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
दुसèया निवेदनात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकèयांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. बाभुळगावसह यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागांतील सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही जिल्ह्याला पीक विमा नुकसानभरपाई योजनेतून वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. विमा हप्ते भरूनही शेतकèयांना मदतीपासून वंचित ठेवणे हा अन्याय असल्याचे त्यात म्हटले आहे.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे  NEET तालुकाध्यक्ष अमेय घोडे, उपाध्यक्ष रेहानखान पठाण, राजेश काटेकर, विनोद वाटमोडे, ज्येष्ठ नेते पांडुरंग लांडगे, सुनील मते, प्रदीप नंदुरकर, अंकुश सोयाम, अभिषेक बहिरे, प्रतीक गणवीर, विपुल बोदडे, असीन दहाट, संकेत देशमुख, समाधान डफळे, अर्जुन मेश्राम, अक्षय दिगुरे, श्रावण शिवरकर, सुभोध नगराळे, विलास चांदेकर, सुयोग आराडे, सारंग गुजर, संदेश आखरे आदींसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.