पाटीदारचा फुल फायर मोड; विराट झाला अवाक! video

    दिनांक :27-May-2026
Total Views |
धर्मशाळा,
Patidar left Virat speechless. आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार रजत पाटीदारने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाटीदारने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये ९३ धावांची नाबाद खेळी करत आरसीबीला प्लेऑफ इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारून दिली.या खेळीदरम्यान पाटीदारने खेळलेला एक अफलातून षटकार विशेष चर्चेत आला आहे. १७ व्या षटकात कागिसो रबाडाने ऑफ स्टंपच्या बाहेर चांगल्या लेंथवर टाकलेला चेंडू त्याने बॅकफूटवर जाऊन कव्हर्सवरून थेट स्टँडमध्ये पाठवला.
 
 

patidar
 
 
या शॉटनंतर स्टेडियममध्ये एकच जल्लोष उसळला, तर समालोचक रवी शास्त्री यांनीही हा शॉट सामन्यातील सर्वोत्तम शॉट असल्याचे म्हटले. या क्षणावर विराट कोहलीची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून ती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाटीदारने या सामन्यात अवघ्या २१ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. हे आयपीएल प्लेऑफमधील संयुक्तपणे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने २०१४ मध्ये चेन्नईविरुद्ध आणि ड्वेन स्मिथने २०१३ मध्ये त्याच संघाविरुद्ध २१ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. तर प्लेऑफमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर असून त्यांनी २०१४ मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध अवघ्या १६ चेंडूंमध्ये ही कामगिरी केली होती. पाटीदारच्या या तुफानी खेळीमुळे आरसीबीच्या डावाला मोठी गती मिळाली असून संपूर्ण सामना त्याच्या नावाने गाजत आहे.