कब्रस्तानात अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार

    दिनांक :27-May-2026
Total Views |
पुणे
Pune Kondhwa कोंढवा परिसरातील कौसरबाग कब्रस्तानात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने पुन्हा आपल्यासोबत राहावे आणि सासरच्या मंडळींकडून आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने जावयाने कब्रस्तानात जाऊन अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
 

Pune Kondhwa Kauserbag cemetery, black magic case, 
मिळालेल्या माहितीनुसार, परवेज अब्दुल अजीज मेमन (रा. हिल मिस्ट गार्डन, कौसरबाग) याचे त्याच्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद सुरू होते. या वादानंतर पत्नी सध्या माहेरी राहत असल्याने ती परत यावी, तसेच सासरच्या मंडळींकडून आर्थिक मदत मिळावी, या हेतूने त्याने अघोरी मार्गाचा अवलंब केल्याचा आरोप आहे.
ही घटना १९ मे रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. परवेज हा कौसरबाग येथील कब्रस्तानात गेला आणि तेथे त्याने सासरच्या मंडळींच्या छायाचित्रांवर सुया टोचून अघोरी विधी केल्याचे सांगण्यात येते. या वेळी परिसरात हालचाल संशयास्पद वाटल्याने स्थानिक नागरिकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला.
 
 
घटनेचा प्रकार समोरPune Kondhwa  येताच संतप्त झालेल्या स्थानिकांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि त्यानंतर त्याला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. मात्र काही दिवसांनी हा प्रकार पुन्हा समोर आल्यानंतर फिर्यादी हसनेन रफिक जाफरानी (वय ४०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी परवेज अब्दुल अजीज मेमन याच्याविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कौटुंबिक वाद आणि संपत्तीवरून निर्माण झालेल्या मतभेदातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुंभार करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.