साहूर,
krishna harle येथील विदर्भगौरव पुरस्कारप्राप्त कवी-लेखक, निनादकार कृष्णा हरले (साहुरकर) यांना वेयली नॅशनल फाऊंडेशन बंगलोर, कर्नाटक द्वारा प्रायोजित रबिंद्ररत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
कृष्णा हरले साहुरकर यांना नुकताच त्यांच्या निनाद काव्यसंग्रहाकरिता हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी बंगळुरूला उपस्थित राहू शकत नाही. ४० वर्षांपुर्वीपासून मराठी साहित्यक्षेत्रात विशेषतः मराठी काव्यक्षेत्रात योगदान देणार्या हरले यांना हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या गेलेला रबिंद्ररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांना यापुर्वी विदर्भगौरव पुरस्कार, त्यांच्या निनाद या काव्यसंग्रहातील कविता या विविध विद्यापीठातील अभ्यासक्रमात निवडल्या जात असल्याचीही माहिती आहे.krishna harle युवाकवी कृष्णा हरले साहुरकर यांना नुकत्याच मिळालेल्या रबिंद्ररत्न पुरस्काराबद्दल त्यांचे खा. अमर काळे, आ. सुमित वानखेडे, अनंत मोहोड, आदींनी अभिनंदन केले.