वर्धा,
raid on online lottery center हमदापूर येथील ऑनलाइन लॉटरी सेंटरमध्ये सुरू असलेल्या जुगार आणि दारू अड्ड्यावर छापा टाकूण ९२ हजार १६० रुपयांचा मुद्देमा जप्त केला.
हमदापूर बस स्टॅण्ड येथे अर्सालन उर्फ सोनू शहा रा. सिंदी (रेल्वे) व त्याचा मित्र शंकर अमनेरकर रा. हमदापूर हे विक्की विचोरे याच्या मालकीच्या गाळ्यात शंकर ऑनलाइइन लॉटरी सेंटरच्या नावावर जुगार अड्डा चालवित असून त्याच ठिकाणी अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी शंकर ऑनलाईन लॉटरी सेंटर येथे छापा टाकला असता अर्सालन उर्फ सोनू शहा (२२) रा. सिंदी (रेल्वे), शंकर अमनेरकर (३४) रा. हमदापूर हे जुगार खेळ चालवित असताना मिळून आले.raid on online lottery center झडती घेतली असता त्या ठिकाणी देशी व विदेशी दारूचा साठा मिळून आला. यावेळी पोलिसांनी दोन संगणक, प्रिंटर, की बोर्ड, रोख, कुलूर, दारू असा ९२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी अर्सालन उर्फ सोनू शहा, शंकर अमनेरकर, प्रफुल्ल मेश्राम रा. हिंगणघाट, विकी विचोरे रा. हमदारपूर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक यशवंत कदम व पोलिस कर्मचार्यांनी केली.