आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता समुद्रपूरचा संघ नेपाळला रवाना

    दिनांक :27-May-2026
Total Views |
समुद्रपूर,
International Karate Competition येथील विद्या विकास महाविद्यालयाच्या विद्या विकास स्पोर्टिंग लबचा संघ नेपाळ येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता रवाना झाला. यावेळी खेळाडूंचा खेळाचे साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. खेळाडू नेपाळ येथील काठमांडू येथे २ ते ४ जून दरम्यान होणार्‍या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
 
 
International Karate Competition
 
नेपाळ येथे गेलेल्या चमुत धनश्री धोटे, रिधा पठान, सानिया उरकुडे, कनक महाकाले, अवेरा रामटेके, समीर देवतळे, मार्मिक जांगळेकर, तेजस उमरडकर, पार्थ भुरे, सोनाली भोंगाडे व प्रशिक्षक सिहान क्रिष्णा ढोबळे यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडू व प्रशिक्षकाचा सत्कार करण्यात आला. International Karate Competition यावेळी विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाटचे अध्यक्ष डॉ. उमेश तुळसकर, सचिव तथा हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, प्राचार्य डॉ. चंद्रकिशोर रेवतकर, उपप्राचार्य प्रा. मेघश्याम ढाकरे, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रदीप कापकर उपस्थित होते.