‘तो बकरी नाही, बकरा आहे

सुनिता अहुजाच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा

    दिनांक :27-May-2026
Total Views |
मुंबई
Sunita Ahuja अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा आगामी कॉमेडी आणि कुकिंग शो ‘माँ है ना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी आपल्या मुलांसोबत सहभागी होणार असून मुंबईत या शोच्या ट्रेलर लाँचचा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमादरम्यान कलाकारांनी धमाल मस्ती करत उपस्थितांचे मनोरंजन केले. मात्र या कार्यक्रमात अभिनेता गोविंदा यांची पत्नी सुनिता अहुजा हिने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
 

Sunita Ahuja 
या कार्यक्रमाला सुनिता अहुजा तिच्या मुलीसोबत उपस्थित होती. विशेष म्हणजे ‘माँ है ना’ या शोच्या माध्यमातून ती छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी सुनिता कार्यक्रमादरम्यान पापाराझींशी संवाद साधताना नेहमीप्रमाणे मस्करीच्या Sunita Ahuja  मूडमध्ये दिसली. यावेळी ती म्हणाली, “बकरी है.” त्यावर मागून कुणीतरी “तो तुमचा नवरा आहे” अशी टिप्पणी केली. हे ऐकताच सुनिता काही क्षण चकित झाली आणि लगेचच “माझा नवरा बकरी नाही,” असे म्हणत तिने पुढे “तो बकरा आहे,” अशी टिप्पणी केली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी सुनितावर टीकेची झोड उठवली आहे.
“हे खूप चुकीचे आहे,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर “आज तू जी काही आहेस ती गोविंदामुळेच आहेस आणि त्याचीच खिल्ली उडवतेस,” अशा शब्दांत दुसऱ्या युजरने नाराजी व्यक्त केली. “गोविंदाशिवाय तुझं अस्तित्व काहीच नाही,” अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.