सिद्धिविनायक कॉरिडॉर प्रकल्पावरून नवा वाद

नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी ठाकरे गटाचा मोर्चा

    दिनांक :27-May-2026
Total Views |
मुंबई
Siddhivinayak corridor project मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात प्रस्तावित असलेल्या कॉरिडॉर प्रकल्पामुळे नर्दुल्ला टँक मैदानाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या मुद्द्यावरून स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र विरोधाची लाट उसळली आहे. प्रस्तावित पार्किंग व्यवस्थेसाठी या मैदानाचा काही भाग वापरण्याचा विचार असल्याने स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध दर्शवला आहे.
 

Siddhivinayak corridor project  
प्रभादेवी परिसरातील नर्दुल्ला टँक मैदान हे मैदान स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग मानले जाते. लहान मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्याचे केंद्र तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन येथे नियमितपणे होत असते. त्यामुळे या मैदानावर पार्किंग किंवा अन्य बांधकाम प्रस्तावित केल्यास सार्वजनिक मोकळ्या जागेवर गदा येईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
 
 
या पार्श्वभूमीवर Siddhivinayak corridor project  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)ने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असून मैदान वाचवण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात स्थानिक आमदार महेश सावंत तसेच नगरसेवक निशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांच्या हक्काच्या मोकळ्या जागा वाचवण्याची मागणी करण्यात आली असून विकास प्रकल्पांच्या नावाखाली अशा सार्वजनिक जागांवर अतिक्रमण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, आमदार महेश सावंत यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, त्यांचा विरोध सिद्धिविनायक कॉरिडॉर प्रकल्पाला नसून मैदान ताब्यात घेण्याच्या प्रस्तावाला आहे. “शिवसेना असताना हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.या वादामुळे सिद्धिविनायक परिसरातील विकास प्रकल्प आणि सार्वजनिक मोकळ्या जागांचे संरक्षण या दोन मुद्द्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून पुढील काळात हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.