कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करा

अ.भा. ग्राहक पंचायत तर्फे बाजार समितीला निवेदन

    दिनांक :27-May-2026
Total Views |
रिसोड,
Agricultural Produce Market Committee कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड बंद असल्याकारणाने शेतकर्‍यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन बाजार समिती पुर्ववत सुरू करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रिसोड तर्फे प्रदेश संघटन मंत्री अभय खेडकर व जिल्हा अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांचे मार्गदर्शनात बाजार समितीचे सभापती व सचिव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
washim
 
कृषी उत्पन्न बाजार समितीने एक पत्रक काढून २२ मे पासून पुढील आदेशापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहील असे जाहीर केले. बाजार समिती बंद असल्याकारणाने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. Agricultural Produce Market Committee शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन बाजार समिती पूर्ववत सुरू करावी असे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रिसोड तर्फे देण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर व सचिव विजय देशमुख यांनी निवेदन स्वीकारले.
 
 
२९ मे पासून बाजार समिती सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी यांना दिले. निवेदन देतेवेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे रिसोड तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, ग्राहक संरक्षण परिषदेचे संतोष वाघमारे, जिल्हा कोषाध्यक्ष जयंत वसमतकर, Agricultural Produce Market Committee तालुका उपाध्यक्ष अरुण लोथे, तालुका सचिव विजय देशमुख, कार्यालय मंत्री सतीश मांदळे उपस्थित होते.