नागपूर,
Inaya Saree Collection सण-उत्सव, लग्नसमारंभ आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आता फॅशनसोबत स्वतःची वेगळी ओळख जपण्याकडे महिलांचा कल वाढत आहे. हाच बदलता ट्रेंड लक्षात घेऊन टाटा समूहाचा ब्रँड ‘तनाएरा’ने आधुनिक साड्यांचे नवे ‘इनाया’ कलेक्शन सादर केले आहे. आधुनिक भारतीय महिलेला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये सहजसुंदर, अष्टपैलू आणि आकर्षक साड्यांचा समावेश करण्यात आला आहे. अवघ्या ३,४९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या या कलेक्शनमध्ये हलक्या वजनाच्या, अंगावर सहज खुलणाऱ्या आणि घोळदार लूक देणाऱ्या साड्या उपलब्ध आहेत. आरामदायी अनुभवासोबतच आकर्षक स्टाईलचा संगम या कलेक्शनमध्ये पाहायला मिळतो. घरगुती समारंभ, लग्नपूर्व विधी, सण-उत्सव तसेच उच्चभ्रू सामाजिक कार्यक्रमांसाठी हे कलेक्शन विशेष ठरणार आहे.

निसर्गातील बदलते रंग, पहाटेची कोमलता, सांजवेळेची समृद्धी आणि फुलांच्या बहरातून प्रेरणा घेत या साड्यांची रंगसंगती आणि डिझाईन तयार करण्यात आले आहे. Inaya Saree Collection अमूर्त फुलांची नक्षी, खगोलीय भूमितीय आकार आणि आधुनिक डिझाईनची झलक या कलेक्शनमध्ये पाहायला मिळते. या लाँचप्रसंगी तनाएराचे रिटेल प्रमुख अनिरबन बॅनर्जी म्हणाले, “विशेष प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या साड्यांचा आमच्या विक्रीत मोठा वाटा आहे. आजच्या महिला प्रत्येक कार्यक्रमात वेगळ्या आणि आत्मविश्वासपूर्ण दिसण्याला प्राधान्य देतात. ‘नेव्हर लुक द सेम’ या संकल्पनेवर आधारित ‘इनाया’ कलेक्शन महिलांना स्वतःची शैली व्यक्त करण्याची संधी देते. परवडणाऱ्या किमतीत आधुनिक आणि उत्सवी साड्यांचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
यंदाच्या लग्नसराईसाठी तनाएराने ‘द व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ आणि ‘रास’ ही दोन विशेष कलेक्शन्सही सादर केली आहेत. ‘द व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ कलेक्शन आल्प्स पर्वतरांगांतील फुलांच्या सौंदर्यापासून प्रेरित असून त्यामध्ये रंग, नक्षीकाम आणि पारंपरिक कलाकुसरीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. तनाएराने ग्राहकांना जवळच्या स्टोअरमध्ये भेट देऊन ही कलेक्शन्स प्रत्यक्ष अनुभवण्याचे आवाहन केले आहे.
Inaya Saree Collection तसेच ही कलेक्शन्स ऑनलाइनही उपलब्ध असून अधिक माहितीसाठी
www.taneira.com तनाएरा अधिकृत वेबसाईट ला भेट देता येईल.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र