अमेरिका-इराण तणाव शिगेला; होर्मुझवरून संकटाची घंटा

    दिनांक :27-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
US-Iran tensions अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिकच वाढत असताना इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा देतानाच त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत करार करण्यासाठी “याचना” करत असल्याचा दावा केला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनुसार, आयआरजिसीचे उपकमांडर मोहम्मद अकबरझादेह यांनी म्हटले आहे की, जागतिक बाजारात तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढत असल्यामुळे अमेरिका आणि युरोप आर्थिक दबावाखाली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या परिस्थितीचा फायदा इराणला होऊ शकतो, तर पाश्चात्य देश अजूनही ऊर्जा संकटाशी सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार नाहीत.
 
 
us-iran tensions
 
अकबरझादेह यांनी पुढे दावा केला की, इराणची क्षेपणास्त्र क्षमता आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण ही देशाची ताकद दाखवते. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, कोणत्याही लष्करी कारवाईला इराण कठोर प्रत्युत्तर देईल आणि अमेरिका-इस्रायलला अशा संघर्षात अपयशाला सामोरे जावे लागेल. दरम्यान, Iआयआरजिसी ने असा दावा केला आहे की गेल्या २४ तासांत होर्मुझ सामुद्रधुनीतून सुमारे २५ व्यापारी जहाजे त्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे मार्गक्रमण करत गेली आहेत. इराणच्या नौदलाकडून या जलमार्गावर “कडक नियंत्रण” ठेवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन सैन्याने दक्षिण इराणमधील क्षेपणास्त्र स्थळांवर आणि काही नौका लक्ष्यांवर कारवाई केल्याच्या वृत्तानंतर दोन्ही देशांतील तणाव आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.