चंद्रपूर,
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे Guardian Minister Dr. Ashok Uike पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे 22 मे रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या चार महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. 22 मे रोजी सकाळी तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या कवडाबाई दादाजी मोहुर्ले, अनिता दादाजी मोहुर्ले, संगीता संतोष चौधरी आणि सुनिता कौशिक मोहुर्ले यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
Guardian Minister Dr. Ashok Uike या कुटुंबीयांच्या सदस्यांची पालकमंत्री डॉ. उईके यांनी गुरुवार, 28 मे रोजी भेट घेतली. राज्य शासन मृतक परिवाराच्या पाठीशी आहे. या परिवारातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांश आपण स्वतः बोलू. तसेच या कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारीसुद्धा सरकार घेईल यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून जंगली प्राण्यांबाबत अलर्ट सूचना द्यावी. जेणेकरून नागरिकांना सतर्क राहता येईल व त्यांचा जीव जाणार नाही. तसेच वनविभागाने जंगलालगतच्या गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे निर्देशही डॉ. अशोक उईके यांनी दिले. यावेळी माजी आमदार अतुल देशकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम, उपवनसंरक्षक कुमारस्वामी आदी उपस्थित होते.