नागपूर विमानतळावर नाईट पार्किंग

अमेरिकेच्या ‘मेम्फिस-पोर्ट’च्या धर्तीवर विकास, पुढील 8 वर्षांत ‘ड्यूअल रनवे’ विमानतळ

    दिनांक :28-May-2026
Total Views |
नागपूर
Nagpur Airport मेट्रो शहर नागपूरला मध्य भारताचे लॉजिस्टिक्स व डिफेन्स हब बनविण्यासाठी जीएमआर ग्रुपने कंबर कसली आहे. नागपूर विमानतळाची सध्या 40 लाख वार्षिक प्रवासी क्षमता आहे. 2026 पर्यंत ही क्षमता 80 लाखांपर्यंत वाढविली जाणार असून ‘नाईट पार्किंग’ची समस्या सोडविण्यासाठी नवा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. अमेरिकेतील ‘मेम्फिस’ व ‘डलास-फोर्ट वर्थ’ विमानतळांच्या धर्तीवर नागपूरचा विकास केला जाणार आहे.

nagpur airport 
Nagpur Airportकाय आहे मास्टर प्लॅन?
 
नवे इंटिग्रेटेड टर्मिनल : पुढील 36 महिन्यांत अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकात्मिक टर्मिनल बांधले जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून जमीन मिळाल्याने विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. सध्याचे टर्मिनल पाडून नवीनीकरण केले जाणार.
दुसरा रनवे : भविष्यातील ट्रॅफिक वाढ लक्षात घेऊन पुढील 8 वर्षांत दुसरा रनवे तयार करण्याची योजना आहे. यामुळे नागपूर ‘ड्यूअल रनवे’ विमानतळ होईल.
नाईट पार्किंगचा प्रश्न सुटणार : सध्या मेट्रो शहरांतील विमानांमध्ये नाईट पार्किंगची समस्या आहे. नागपूर विमानतळावर पुरेशी जागा व सुविधा उपलब्ध करून विमान कंपन्यांना आकर्षित केले जाणार आहे. भारतीय संरक्षण विमान कंपन्याही येथे तळ ठोकणार असल्याने डिफेन्स हबला चालना मिळेल.
Nagpur Airport नागपूर का महत्त्वाचे?
मध्य भारताचे केंद्र : सर्व मेट्रोंपासून समान अंतरावर
मिहान प्रकल्प : आधीच कार्गो हब
डिफेन्स हब : भारतीय संरक्षण कंपन्यांचा तळ
24 बाय 7 ऑपरेशन : नाईट पार्किंगसाठी अनुकूल