केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
यवतमाळ,
मोदी सरकार सर्व धर्मांना न्याय देणारे व देशाचा विकास करणारे सरकार आहे. या सरकारमार्फत विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री Ramdas Athawale रामदास आठवले यांनी गुरुवार, 28 मे रोजी झालेल्या पत्रपरिषदेत दिली. पुढे बोलताना आठवले म्हणाले, मोदी सरकार ज्या विविध योजना राबवीत आहे, त्यांचा फायदा मुसलमान समाजालासुद्धा होत आहे. या सरकारच्या सर्व योजना सर्व समाजासाठी आहेत.
काँग्रेसने कधीही या देशात एकता निर्माण करण्याचे काम केले नाही. त्यांनी फक्त दोन धर्मांत वाद कसा निर्माण होईल, हेच पाहिले आहे. मात्र, मोदी सरकारमध्ये देशात एकता कशी निर्माण होईल. यावर जास्त भर देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थिती असल्याने काही प्रमाणात पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. यावरसुद्धा लवकरच तोडगा निघेल, त्या दृष्टीने काम सुरू असल्याचे यावेळी Ramdas Athawale रामदास आठवले यांनी सांगितले.