बहुजन हिताय संघाची ४७१ वी सभा उत्साहात

    दिनांक :28-May-2026
Total Views |
नागपूर,
Bahujan Hitay Sangh लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात बहुजन हिताय संघाची ४७१ वी साप्ताहिक सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय विभागाचे माजी उपायुक्त आयु. संजीव गाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रशासकीय अधिकारी व साहित्यिक आयु. प्रवीण बागडे, तर विशेष अतिथी म्हणून सहायक पोलीस आयुक्त आयु. अशोक बागुल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्रिशरण, पंचशील आणि बुद्धवंदनेने करण्यात आली. बौद्धाचार्य देविदास राऊत यांनी आनापानसती ध्यानाचे मार्गदर्शन केले.
 

Bahujan Hitay Sangh
 
प्रमुख अतिथी प्रवीण बागडे यांनी उपस्थितांना बावीस प्रतिज्ञांचे वाचन करून घेतले. आपल्या मनोगतात त्यांनी समाजात शांतता, बंधुता आणि सामाजिक एकात्मता निर्माण करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “शिक्षणातूनच खरी सामाजिक समानता निर्माण होऊ शकते,” असे प्रतिपादन त्यांनी केले. Bahujan Hitay Sangh त्यांच्या सामाजिक आणि साहित्यिक कार्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष अतिथी अशोक बागुल यांनी मानवतेचा संदेश देत जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाज एकत्र आणण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत शिंगोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन चुन्नीलाल जांभूळकर यांनी मानले.
 
सौजन्य: प्रवीण बागडे, संपर्क मित्र