सिंदी (रेल्वे),
mla kunawar सिंदी रेल्वे लगतच्या नंदपूर गावात जागरूक गावकरी आणि सरपंचाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ ठळला. गावालगत शेत असलेल्या शेतकर्यांनी उन्हाळी मशागत करताना बुधवार २७ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान शेताचा धुरा पेटविला. अचानक जोरदार वादळवारा सुटला आणि पाहता पाहता लावलेल्या आगीने गावाकडे धाव घेतली. अर्धा किलोमीटर अंतर कापीत आग गावाच्या वेशीवर येवून ठेपली. मात्र, जागरुक नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले, अन्यथा आगीने अख्खे गाव कवेत घेतले असते.

गावाशेजारील शेतीचा धुरा पेटविल्यानंतर वादळ वार्यामुळे आगीने गावाच्या वेशिकडे आगेकुच केली. आग वेशिवर येताच जागरुक गावकर्यांनी गावाच्या दुर्गाताई ढोणे यांना माहिती दिली. लागलीच सरपंच ढोणे यांनी आमदार समीर कुणावार यांना या घटनेची माहिती देताच आमदारांनी सिंदी रेल्वे येथील नगराध्यक्ष राणी कलोडे यांना सुचित करून पालिकेचा अग्निशमन दल तात्काळ नंदपूर येथे पाठविण्याचा आदेश दिला.mla kunawar परिस्थिती लक्षात घेता नगराध्यक्ष कलोडे यांनी अर्ध्या तासात अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचविले आणि आगीवर नियंत्रण मिळविले. गावकर्यांची जागरुकता, सरपंच, नगराध्यक्ष आणि आमदार कुणावार यांच्यामुळे नंदपूर गाव आगीच्या विळ‘यात जाऊन बेचिराख होता होता बचावले. आग विझविण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल दोंदल, सुधाकर दोंदल, अमोल पेरकुंडे, अमोल दोंदल यांनी सहकार्य केले