दुचाकीस्वार ठार
ढाणकी,
Accident on Hardada-Dhanki route हरदडा ते ढाणकी महामार्गावर मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गजानन आहेर (रा. ढाणकी) असे मृतकाचे नाव असून ते ढाणकीच्या युनियन बँकेत कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन आहेर हे एका तरुणासह ब्राह्मणगाव येथून दुचाकीने ढाणकीकडे येत असताना हरदडा-ढाणकी महामार्गावर खोबाजी फुलकोंडवार यांच्या शेताजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
Accident on Hardada-Dhanki route अपघात इतका गंभीर होता की गजानन आहेर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेला तरुण शेख अजीम शेख राजा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविला. या घटनेमुळे ढाणकी परिसरात हळहळ आहे. पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सागर अन्नमवार व जमादार मोहन चाटे करीत आहेत.