‘माझी बायको बुरखा घालते, मुलांचा धर्म बदलायला सांगते’

मुंबईतील एका लोकप्रिय बँकेत धर्मांतराचा प्रकार?

    दिनांक :28-May-2026
Total Views |
मुंबई
Religious Conversion नाशिकमधील ढउड अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये धर्मांतर प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता मुंबईतील एका मोठ्या बँकेत धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आणि संशयित प्रकार उजेडात आला आहे. माझी पत्नी, आता बुरखा घालते, रोझा धरते आणि मुलांचं धर्मांतर करण्याचं विचारत आहे, अशी तक्राराच या महिलेच्या पतीने केली आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे.
  
conversion
Religious Conversion मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सगळ्यात मोठी बँकेत हा प्रकार घडला आहे. या बँकेची मुंबईच्या नरिमन पॉईंट येथे शाखा आहे या बँकेच्या शाखेत एका महिलेसोबत धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा तिच्या पतीचा दावा केला आहे. आपली पत्नी गेल्या काही दिवसांपासून विचित्र वागत असून इस्लाम धर्माकडे वळली असल्याचा दावाच पतीने केला आहे.

Religious Conversion पतीने पत्रात केले धक्कादायक आरोप
पत्नी इस्लाम धर्माचा अभ्यास करत असून इस्लाम स्वीकारण्याचा विचार करत असल्याचं तिने सांगितलं. तसंच तिने मुलीचंही धर्मांतर करण्याचा विचार व्यक्त केल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर या महिलेच्या पतीने बँकेमधील अन्य कर्मचारी साफीन गोदल यांच्यासोबत संबंध असल्याचाही आरोपही केला आहे.
Religious Conversion पत्नीने स्वतः आणि मुलीच्या धर्मांतराची इच्छा व्यक्त केली असता पतीने तीला राजस्थाच्या उदयपूर येथील गावी नेलं. मात्र, 18 एप्रिल 2026 रोजी पत्नी आणि मुलगी अचानक बेपत्ता झाल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. पत्नीवर दबाव किंवा प्रभाव टाकला जात असल्याची शक्यता व्यक्त करत पतीने गंभीर आरोप केले आहेत.
 
Religious Conversion याआधीही आदिल नावाच्या व्यक्तीकडून आर्थिक आणि लैंगिक शोषण झाल्याचाही आरोप पत्रात करण्यात आला आहे. याच सोबत तक्रारदार पतीने आपल्या पत्नीची तातडीने राजस्थानमधील उदयपूर येथे बदली करण्यात यावी, अशी मागणी बँक व्यवस्थापनाकडे करण्यात आली आहे.