'Andaman: ek tirthkshetra' आजचा समाज अधिकाधिक बुद्धीप्रधान व पांढरपेशा होत असताना वैफल्य, निराशा व सामाजिक ताण वाढताना दिसत असताना सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचे जीवन संकटांशी दोन हात करण्याची प्रेरणा देते. सावरकर यांच्या विचारांचे स्मरण प्रत्यक्ष आचरणात व्हायला हवे, असे विचार अमृत वक्ता विवेक घळसासी यांनी आज येथे व्यक्त केले. ‘स्वा. सावरकर जाणून घेताना’ या विषयावर विवेक घळसासी म्हणाले की, मागील काही वर्षात विविध कारणांनी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून हा वैयक्तिक जीवनामधील निराशेचा, वैफल्याचा अतिरेक समाजात पाहायला मिळतो. अपयश जगण्यापेक्षा महत्त्वाचे असू शकते काय?
वर्तमानातील समाजस्थिती पाहता सावरकर व अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या हाल-अपेष्टा, छळ, अन्याय, अत्याचार भोगला त्याचे नित्य स्मरण आपल्या जीवनात राहिले पाहिजे. आज समाजात आलेली हतबलता, निराशा दूर करण्यास हाच उपचार ठरेल. सावरकरांना समजून घेताना शिवाजी महाराज, सावरकर व इतर क्रांतिकारक घडवणारे वातावरण आज आपल्या कुटुंबात आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. सेल्युलर जेलच्या लाईट अँड साऊंड शोविषयी बोलताना त्यांनी संदीप जोशी यांच्या संकल्पनेचे विशेष कौतुक केले. काळीज हेलावून टाकणारा हा अनुभव आहे. त्या यातना, त्याग व राष्ट्रभक्ती अनुभवताना अंगावर शहारे येतात, असे ते म्हणाले.
'Andaman: ek tirthkshetra' प्रास्ताविकातून प्रफुल्ल माटेगावकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, संदीप जोशी यांच्या संकल्पनेमुळे ही भव्य सेल्युलर जेल प्रतिकृती उभारणे शक्य झाले. माझे आयुष्य सार्थकी लागल्याची भावना आहे. मी केवळ एक माध्यम ठरलो. ही प्रतिकृती उभारताना आर्किटेक्ट लक्ष्मी पातूरकर, हर्षद भीसीकर, सुदामा इंगळे, महेश वानखेडे, मनमोहन कुमावत, आदित्य राठोड व पत्नी अपूर्वा माटेगावकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
आज महोत्सवात...
शुक्रवारी 29 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रसिद्ध अभिनेते व वक्ते शरद पोंक्षे यांचे हिंदुत्व... या विषयावर व्याख्यान